बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकलेंची रि-एन्ट्री

अभिजित बिचुकले पुन्हा एन्ट्री करणारे ठरले तिसरे स्पर्धक

मुंबई : बिग बॉस मराठीमध्ये दर आठवड्याला काही ना काही घडताना पहायला मिळत आहे. त्यातच स्पर्धकांचे घरात ये-जा हे तर या सीझनचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. कारण आता या घरात पुन्हा एकदा आणखी एका स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. चेक बाऊन्स प्रकरणी अटक करण्यात आलेले साताऱ्याचे अभिजित बिचुकलेंचा घरात प्रवेश होणार आहे.

आज सकाळी ते त्यांना एका प्रकरणात जामिन मिळाला आहे. त्यामुळे आज सकाळी कोल्हापूरवरून मुंबईला निघाले आहेत. आज त्यांचा घरात प्रवेश होणार आहे परंतु, रविवारच्या भागात अभिजित बिचुकले प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.
चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी अभिजित बिचुकले यांना सातारा पोलिसांनी बिग बॉसच्या घरातून अटक केली होती. त्यानंतर आणखी एका खंडणीच्या प्रकरणात बिचुकले यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, बिचुकले हे मुंबईतून कोल्हापूरात परत येण्याची शक्‍यता कमी असल्यामुळे न्यायालयाने त्यांना न्यायालयिन कोठडीत पाठवले होते. अखेर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आता बिग बॉसच्या घरात बिचुकलेंच्या एन्ट्रीने आणखी काही मसाला प्रेक्षकांना पहायला मिळणार हे नक्‍की.

Leave A Reply

Your email address will not be published.