नवी दिल्ली : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषि सुनक आणि लिझ ट्रस यांच्यामध्ये जोरदार टक्कर आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांना झटका बसला आहे. ऋषि सुनक पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मागे पडताना दिसत आहेत.
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या रिपोर्टनुसार, ब्रिटीश अर्थमंत्री नदिम झहावी यांनी लिझ ट्रस यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या पुढच्या नेत्या होण्यासाठी औपचारिक पाठिंबा दिला आहे.
रिपोर्टनुसार नदिम झहावी यांनी लिझ ट्रस यांच्या समर्थनार्थ म्हटले आहे की, ‘परराष्ट्र सचिव ट्रस जुन्या आर्थिक पुराणमतवादाला छेद देतील आणि आपली अर्थव्यवस्था पुराणमतवादी पद्धतीने चालवतील.’ असा उल्लेख ‘द टेलिग्राफ’च्या रिपोर्टमध्ये आहे.
ब्रिटिश अर्थमंत्र्यांनी लिझ यांना पाठिंबा देणं ही ऋषी सुनक यांच्यासाठी चांगली बातमी नाही. मात्र, सुनक हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या लिझ ट्रसला तगडी टक्कर देत आहेत.