बीड – भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यानाथ सहकारी साखर कारखान्याचं बॅंक खातं सील करण्यात आले आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कामगारांची भविष्य निधीची रक्कम जमा न केल्याने, या कारखान्याचं बॅंक खात सील करण्यात आले आहे.
औरंगाबादचा भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने वैद्यनाथ कारखान्याचे बॅंक खाते सील केले आहे. एवढच नाहीतर त्यातून 92 लाख रुपये जप्त देखील करण्यात आलेले आहेत. वैद्यनाथ कारखान्याने पीएफची रक्कम थकवली होती, त्यांना नोटीस देण्यात आली होती.
मात्र तरीही रक्कम न भरण्यात आल्याने कारखान्याचे बॅंक खाते सील करण्यात आले आहे व त्यातून रक्कम वसूल करण्यात आलेली आहे, अशी माहिती औरंगाबाद पीएफ ऑफिसचे क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी दिली.