लंडन – न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन यास दुखापत झाली आहे. भारत-न्यूझीलंड आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे. मात्र त्याआधीच कर्णधार केन विलियमसनला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत तो न खेळण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडचे मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी ही माहिती दिली आहे. न्यूझीलंड संघास हा मोठा धक्का बसला आहे.
Gary Stead update, Birmingham:
– Pace bowlers from Lord’s won’t all play 2nd Test
– Trent Boult available & likely to return
– Mitch Santner ruled out with his cut left index finger
– Kane Williamson’s left elbow injury being monitored & a decision to be made tomorrow#ENGvNZ pic.twitter.com/2o46zoXWqw— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 8, 2021
विलियमसन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मध्ये खेळणार की नाही यासंदर्भातील निर्णय आज बुधवारी घेतला जाणार आहे. विलियमसनच्या कोपराला दुखापत झाली असून तो दुसरी कसोटी खेळणार की नाही याचा निर्णय आज घेतला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत केनला पहिल्या डावात १३ तर दुसऱ्या डावात फक्त एक धाव करता आली होती. दरम्यान दुसऱ्या कसोटी आधी न्यूझीलंडला एक दिलासा मिळाला आहे. तो म्हणजे बोल्टचा संघात समावेश झाला आहे. पहिल्या कसोटीत तो खेळू शकला नव्हता.