भाजपला मोठा धक्का! गुजरातमध्ये पक्षावर नाराज होत ‘या’ बड्या नेत्याने सोडला पक्ष

नवी दिल्ली : देशात एकीकडे कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी महिनाभरापासून आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे आता भाजपाला आणि पर्यायाने केंद्र सरकारला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भाजपचे भरुचचे खासदार मनसुख बसावा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. खासदार मनसुख वसावा अनेक दिवसांपासून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी नाराज आहेत. त्यातून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याची जोरदार चर्चा आहे.

खासदार मनसुख वसावा यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मोठा धक्का मानला जात आहे.भरुचचे भाजपचे खासदार मनसुख धनजी वसावा हे आदिवासी नेते आहेत. खासदार वसावा यांनी 28 डिसेंबरलाच गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर पाटील यांना पत्र लिहून आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं सांगितलं होतं.

‘माझ्याकडून झालेल्या चुकांमुळे पक्षाचं नुकसान होऊ नये, यासाठी आपण राजीनामा दिला आहे.’,असं खासदार मनसुख वसावा यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

खासदार मनसुख वसावा यांनी पत्रात, पक्षावर माझी निष्ठा आहे. मी प्राणाणिकपणे पक्षाचं काम केलं. सोबतच पक्ष आणि जीवनाचा सिद्धांत याचं काटेकोरपणे पालक करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी एक माणूस आहे. माणसाकडून चूक होतच असते.

माझ्याकडून झालेल्या चुकांमुळे पक्षाचं नुकसान होऊ नये, म्हणून आपण राजीनामा देत आहे, लोकसभेचे कामकाज सुरू होण्याआधीच आपण खासदारकीचाही राजीनामा देणार असल्याचं मनसुख वसावा यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.