एअर इंडियाला मोठा झटका

थकबाकी रोखल्यामुळे तेल कंपन्यांकडून पुरवठा बंद

नवी दिल्ली : एअर इंडिया या सरकारी प्रवासी विमान कंपनीला मोठा झटका बसला. कारण मागील थकबाकी न भरल्याने तेल कंपन्यांनी देशातील सहा विमानतळांवर या विमानांसाठीचा इंधन पुरवठा थांवला आहे. मात्र, याचा एअर इंडियाच्या विमानांच्या उड्डाणावर याचा कुठलाही परिणाम झाला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे.

एअर इंडियाचे प्रवक्‍ते धनंजय कुमार यांनी याविषयी माहिती दिली. आर्थिक मदतीशिवाय एअर इंडिया मोठ्या प्रमाणावरील कर्जाचे उत्तरदायित्व हाताळू शकत नाही. मात्र, तरीही एक आशादायी चित्र असे आहे की, या अर्थिक वर्षातील आमची आर्थिक कामगिरी ही खूपच चांगली राहिली आहे. कंपनी आता फायद्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. दरम्यान, विविध राज्यांतील तेल कंपन्यांनी देशातील सहा विमानतळांवरील एअर इंडियाच्या विमानांसाठीचा इंधन पुरवठा थांबवला. यामध्ये कोचीन, विशाखापट्टणम, मोहाली, रांची आणि पुणे या विमानतळांचा समावेश आहे. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×