‘कितनी बार बोला मै तेरे को, कि विराट को मत छेड़’

कोहलीच्या सेलिब्रेशनवर बिग बींचे हटके ट्विट 

हैद्राबाद – वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यातील भारताच्या विजयाचा हिरो विराट कोहली ठरला. विजयासाठीचे २०८ धावांचे आव्हान भारतीय संघाने १८.४ षटकांत ४ बाद २०९ धावा करत पूर्ण केले. भारताकडून विराटने ५० चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारासह सर्वाधिक नाबाद ९४ धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या तडाखेबाज नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर ६ गडी आणि ८ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आहे.

विराटने या विजयाचे सेलिब्रेशन वेस्ट इंडिजच्या अनोख्या स्टाईलने केले. वेस्ट इंडिजचा गोलंदाज केजरिक विल्यम्स हा गोलंदाजी करताना विकेट मिळवल्यानंतर प्रतिकात्मक स्वरुपात फलंदाजाचं नाव आपल्या डायरीत लिहून ते पान फाडण्याचा अभिनय करतो. मात्र विराटने आज विल्यम्सचा डाव त्याच्यावर उलटवत बाजी मारली. यावर अमिताभ बच्चन यांनीही हटके स्टाईलने विराटाचे कौतुक केले. अमिताभ बच्चन म्हणाले, यार कितनी बार बोला मै तेरे को, कि विराट को मत छेड़, मत छेड़, मत छेड, पर सुनताइच किधर है तुम। अभी पर्ची लिख के दे दिया ना हाथ में। देख देख वेस्टइंडीज का चेहरा देख, कितना मारा उसको, कितना मारा, असे त्यांनी ट्विट केले आहे. सोबतच अँथनी भाई कि तरफसे, असेही त्यांनी सांगितले. अमिताभ बच्चन यांच्या ‘अमर अकबर अँथनी’ चित्रपटातील हा प्रसिद्ध डायलॉग आहे.

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटला विराट कोहलीनेही दाद दिली. मस्त डायलॉग मारला आहे सर, तुम्ही नेहमीच आमचे प्रेरणास्रोत आहेत, असा रिप्लाय विराट कोहलीने बिग बींना दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.