मुंबई – आपल्या दिलखेच अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे अभिनेत्री “क्रिती सनॉन’ रसिकांच्या दिलों की धडकन बनली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या ‘क्रिती सनॉन’कडे पाहिलं जातं.
मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री क्रिती सनॉनला ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी क्रितीची अनेकांनी तारीफ केली होती.
‘हिरोपंती’ या चित्रपटानंतर तिने ‘बरेली की बर्फी’, ‘स्त्री’, ‘दिलवाले’, ‘कलंक’, ‘लुकाछुपी’, ‘पानीपत’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून क्रितीने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला. क्रिती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ आपल्या फॅन्सशी शेअर करत असते.
नुकतंच क्रितीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही बोल्ड अँड हॉट फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये क्रिती प्रचंड मादक दिसत आहे. इंस्टाग्रामवर काही तासांत या फोटोंना १ मिलियनहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. उत्तम अभिनयासोबतच क्रितीच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.
क्रितीच्या लूकवर तिचे फॅन्स कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात. इतकेच नाही तर तिच्या या फोटोंनी बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनाही भुरळ पाडली आहे. त्यांनी क्रितीच्या या फोटोवर “वॉव..’ अशी कमेंट केली आहे. सध्या तिचे हे सोशलवर तुफान व्हायरल होत आहे.