बिग बींच्या बहुचर्चित ‘झुंड’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज

मुंबई – दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु आहे. या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. आता या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे.

अमिताभ बच्चन यांनी झुंडचे पोस्टर ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन निळ्या कपड्यांमध्ये एका भितीकडे पाहताना दिसत आहे. या भिंतीच्या पलीकडे झोपडपट्टी दिसत आहे. नागराज मंजुळेचा आगामी ‘झुंड’ सिनेमालाही सैराटप्रमाणेच रसिकांची पसंती मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मात्र सुरूवातीपासूनच सिनेमा वादाच्या भोव-यात अडकला आहे. सुरूवातीला सिनेमाच्या मेकर्सवरच कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. अनेक वादाला बाजुला सारत हा सिनेमा अखेर पूर्ण झाला आहे.

या सिनेमाच्या शूटिंगवेळी अनेक अडचणी आल्या. सतत शूटिंगच्या तारखांमध्ये बदल होत होता यामुळे अमिताभ यांचे कामाचे शेड्युअलही बिघडत होते. त्यामुळे अमिताभ यांनी हा सिनेमा करणार नसल्याचे नागराज मंजुळेला कळवले होते. निर्मात्यांकडून घेतलेले मानधनही अमिताभ यांनी परत केले होते. अमिताभ यांना परत सिनेमात आणण्यासाठी आमिर खानला मध्यस्ती करावी लागली. केवळ आमिर खानच्या सांगण्यावरून अमिताभ बच्चन पुन्हा या सिनेमात काम करण्यास तयार झाले. ‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणा-या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिकेत झळकणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule) on

शूटिंगवेळी अमिताभ हे व्हॅनिटीत न बसता झोपडपट्टीतील मुलांसह वेळ घालवत असत. याच मुलांबरोबर त्यांनी सिनेमात शूटिंगही केले आहे. नागपूरचे निवृत्त क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे.

 

View this post on Instagram

 

…. hmmm .. to put it on the ‘gram’ or not .. ?

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here