मुंबई -अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांचा आगामी “चेहरे’ 30 एप्रिलला रिलीज होणार आहे. हा सिनेमा गेल्या वर्षी जुलैमध्ये रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक सिनेमांचे रिलीज होणे रखडले होते. त्याचप्रमाणे “चेहरे’चा रिलीज देखील रखडला होता. स्वतः अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये “चेहरे’ 30 एप्रिलला रिलीज होणार असल्याचे म्हटले होते.
“चेहरे से बडा की नकाब नहीं होता.’ असे बच्चन यांनी या पोस्टमध्ये म्हटले ओते. “चेहरे’ एक सस्पेन्स थ्रिलर आहे. बच्चन यांनी पोस्ट केलेल्या “चेहरे’च्या पोस्टरमध्ये बच्चन. इमरान हाश्मी आणि इतर कलाकार रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते आहे. इमरान हाश्मीनेही असाच मेसेज पोस्ट करून “चेहरे’ची रिलीज डेट जाहीर केली आहे.
या सिनेमामध्ये रिया चक्रवर्तीही असणार आहे, असे समजले आहे. मात्र कलाकारांच्या यादीमध्ये तिच्या नावाचा उल्लेख नाही. 2019 मध्ये या सिनेमाचे शुटिंग सुरू झाले होते. तेंव्हा ती या सिनेमात असणार हे पक्के समजले होते. पण नंतर तिचा बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ती अडकली.
तिला जामीनही मंजूर आला आहे. त्यामुळे आता तिचा या सिनेमातला सहभाग उघड व्हायला काही हरकत नसावी. “चेहरे’मध्ये अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.