मुंबई- अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घरी दरवर्षी दिवाळी पार्टी साजरी केली जाते. मात्र या वर्षी ही पार्टी होणार नाही आहे. याचं कारण म्हणजे यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे किंवा अन्य आजारांमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले.
यावर्षी अभिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील खास म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि इतरही काही दिग्गज सेलिब्रिटींच्या निधनामुळं यंदा बिग बींच्या घरी दिवाशीचा उत्साह हा काहीसा आवरताच घेतल्याचं पाहायला मिळणार आहे.
ऋषी कपूर हे अमिताभ बच्चन यांचे फक्त फार चांगले मित्रच नसून, त्यांचे नातेवाईकही होते. बिग बींची मुलगी श्वेता बच्चन हिचा विवाह ऋषी कपूर यांचा भाचा निखिल नंदा याच्याशी झाला. त्यामुळं या नात्याच्या बंधनात ही दोन कुटुंबही अडकली. कुटुंबातील एका खास व्यक्तीच्या निधनामुळंच दिवाळीचा Diwali 2020 सण अगदीच साधेपणानं साजरा करण्याला ते प्राधान्य देताना दिसतील.
दरम्यान, या वर्षी बॉलीवूडसोबत सगळ्यांनाच कोरोनाचा फटका बसला आहे. त्यात आपण अनेक आपल्या आवडत्या कलाकारांना गमावलं आहे. त्यामुळे सेलेब्रिंटींच्या घरातच नाही तर सामान्य माणसाच्या घरात देखील दिवाळी साधेपणाने साजरी होणार आहे.