बॉलीवूडमधील श्रेष्ठ अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका पक्षिणीचा व्हिडिओ शेअर करून लोकांना आईचे महत्त्व पटवून दिले आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून अनेकजण या व्हिडिओला भरभरून कमेंट्स देत आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये पक्षाच्या मादी जातीने आपल्या पिलांना जन्म दिला असून त्या पिलांची अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी तिने त्यांना आपल्या पंखाखाली घेतले आहे. दरम्यान, तिच्यावरून ट्रॅक्टर जातो. ट्रॅक्टर येतानाची चाहुल लागताच ती आपल्या पंखांच्या जोरावर आपल्या पिलांचे कसे संरक्षण करते हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. हृदयाला स्पर्शून जाणारा हा व्हिडिओ पाहताच आपोआपच सर्वांना आईचे महत्त्व कळेल. अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.