हॉस्पिटलमध्ये सुद्धा बिग बी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या तीन दिवसांपासून रूग्णालयात दाखल आहे. यकृताच्या त्रासामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बच्चन यांना जास्त त्रास होऊ लागल्यामुळे मंगळवारी रात्री 2 वाजता त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. आपले यकृत केवळ 25 टक्केच कार्यरत असल्याचे अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी सांगितले होते.  

दरम्यान, हॉस्पिटलमध्ये सुद्धा बिग बी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असल्याचे दिसून येत आहे. त्यांचे ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतायेत. अमिताभ यांनी 14 तासांपूर्वी शेवटचे ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांच्यासोबत जया बच्चनसुद्धा दिसतायेत. त्यांनी  जया बच्चन यांना करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.