Telegram CEO Pavel Durov Arrested | टेलिग्रामचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पावेल ड्युरोव यांना पॅरिसमध्ये अटक करण्यात आले आहे. ड्युरोव हे आपल्या खासगी विमानाने प्रवास करत होते. त्यादरम्यान त्यांच्यावर पॅरिसच्या बोर्जेट विमानतळावर कारवाई करण्यात आली.
टेलिग्राम कंपनीत मॉडरेटर्स नसल्यामुळे या मेसेजिंग अॅपवर गुन्हेगारीविषयक कृत्य उघडपणे चालत होते, असा आरोप करण्यात आला होता. या आरोपांबाबत चौकशी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पावेल यांच्या अटकेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यावर टेलिग्रामने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पोलिसांचा असा दावा आहे की, मॉडरेटरच्या कमतरतेमुळे या मेसेजिंग ॲपवर गुन्हेगारी कृत्ये विनाअडथळा सुरू राहू शकतात. दुबईतून कारभार चालणाऱ्या टेलिग्रामची स्थापना रशियन वंशाच्या ड्यूरोव यांनी केली होती. ड्यूरोव यांनी व्हीके सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु केला होता. त्याच्या माध्यमातून सरकारच्या विरोधी होत असलेल्या कारवायांना आळा घातला जावा, असे सरकारने सांगितले होते. पण याचे पालन करण्यास नकार दिल्यानंतर ड्यूरोव यांनी ती कंपनी विकली आणि 2014 मध्ये रशिया सोडला.
पावेल ड्युरोव कोण आहेत?
पावेल ड्युरोव हेटेलिग्राम या मेसेजिंग अॅपचे संस्थापक आहेत. पावेल यांचा जन्म रशियामध्ये झाला. ते 39 वर्षांचे आहेत. रशिया आणि फ्रान्समधील माध्यमांनुसार ड्युरोव यांनी 2021 मध्ये फ्रान्सचे नागरिकत्व स्वीकारले होते. 2017 सालापासून टेलिग्राम हे माध्यम दुबईतून चालवले जात होते. फोर्ब्सनुसार पावेल यांची एकूण संपत्ती 15.5 अब्ज डॉलर्स एवढी आहे.
हेही वाचा:
पुणे जिल्हा : टेकवडीतील नुकसानीचे तहसीलदारांकडून पाहणी