नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून देशभरात ईडीचे धाडसत्र सुरु आहे. नुकतेच अशाच कारवाई दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक झाली आहे. दरम्यान, आज ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीच्या पथकाने दिल्ली आणि इतर ठिकाणाच्या नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा टाकला आहे.
ईडीचे अधिकारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात उपस्थित असून शोध मोहीम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही चौकशी करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.
नॅशनल हेराल्ड केस प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर ईडीने दिल्लीतील नॅशनल हेराल्ड हाऊसवर छापा टाकला. दस्तऐवजांच्या शोधात नॅशनल हेराल्डच्या ठिकाणांवर ईडीने छापे मारले.
या दरम्यान 10 जनपथवर झालेल्या दस्तऐवजांचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणाशी संबंधित अनेकांच्या ठिकाणांवर छापेमारी होऊ शकते. ईडी सध्या नॅशनल हेराल्ड आणि नवजीवनच्या ऑफिस हेराल्ड हाऊसमध्ये छापा मारला जात आहे.