नाशिक – नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव-विंचुर रस्त्यावर झालेल्या अपघातात काल रात्री पाच जण ठार झाले. रिक्षाला ट्रकची धडक बसून हा अपघात झाला. ठार झालेले सर्व जण रिक्षातून प्रवास करीत होते.
ही रिक्षा विंचुरहून लासलगावला जात असताना भरधाव ट्रकशी तिची धडक झाली. ठार झालेल्यातील चार पुरूष 60 ते 65 वयोगटातील आहेत तर त्यातून प्रवास करणारी महिला 40 वर्षांची आहे. त्यांची ओळख पटली आहे.
ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मृतांमध्ये रिक्षा चालकाचाही समावेश आहे. ट्रक चालक भरधाव वेगात होता. त्याचे वाहनाच्या स्पीडवर नियंत्रण राहिले नाही. त्यातून ट्रकची रिक्षाला जोरदार धडक बसल्याने रिक्षातील प्रवासी जागीच गतप्राण झाले.