थरकाप उडवणारा व्हिडीओ! दैव बलवत्तर म्हणून…भरधाव ट्रकच्या चाकाखाली येऊनही दुचाकीस्वार वाचले

मुर्शिदाबाद – पश्चिम बंगालमधील  मुर्शिदाबाद येथे दुचाकीस्वार आणि ट्रकचा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र, अंगाचा थरकाप उडवणारी अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

मुर्शिदाबाद येथे दुचाकीस्वाराने समोरून येणारा भरधाव ट्रक पाहताच अचनाक ब्रेक लावला.  अचानक ब्रेक लावल्याने आणि वेग जास्त असल्याने दुचाकीस्वार दुचाकीसह जोराने घसरत  ट्रकच्या चाकाखाली आले.

पण, ट्रकचालकाने वेळीच ट्रक थांबवल्याने आणि दैव बलवत्तर म्हणून दुचाकीवरील दोघांचे प्राण वाचले आहेत.  अंगाचा थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ  हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.