भोपाळ : मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात आजची सकाळ ही भीषण अपघाताने झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. येथील राष्ट्रीय महामार्गावर बस आणि कंटेनरची जोरात धडक बसली. या भीषण दुर्घटनेत 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे. तर या दुर्घटनेत 13 जण जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात येत असून स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.
Madhya Pradesh | Seven passengers died on the spot, 13 injured in a collision between a bus and container truck in Bhind (near Virkhadi Village). Out of the 13 injured, four are critical and have been referred to Gwalior. The incident is being investigated: Bhind SP, Manoj Singh
— ANI (@ANI) October 1, 2021
अपघाताची घटना घडताच परिसरात मोठा गोंधळ सुरू झाला. प्रवाशांची ओरड आणि मदतीच्या याचनेने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. गोहद चौक ठाणे परिक्षेत्रातील डॉग बिरखडी येथे ही घटना घडली.
भिंडचे पोलीस अधीक्षक यांनी या घटनेची माहिती देताना बसमधील 13 प्रवासी जखमी असून त्यातील 4 जणांनी प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले आहे. तसेच, या जखमींना ग्वालियर येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याचेही एसपी मनोज सिंग यांनी सांगितले.