सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. आचरा समुद्रामध्ये ही दुर्घटना घडली आहे. समुद्रामध्ये मच्छिमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांची बोट दगडाला आपटल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये बोटीच्या मालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण थोडक्यात बचावला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय घडले नेमके?
दाट धुक्यामुळे अंदाज न आल्यानं आचरा समुद्रामध्ये मच्छीमारी करणारी बोट दगडाला आपटून अपघात घडला. यामध्ये बोट मालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे, या बोटीमध्ये चौघेजण होते, चौघांपैकी तिघांचा मृत्यू झाला तर एक थोडक्यात बचावला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघातातून वाचालेला खलाशी पोहत किनारपट्टीवर आला, त्याने घडलेल्या घटनेची माहिती तेथील ग्रामस्थांना दिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. बोट दगडाला जोरात आपल्यामुळे बोट जाग्यावरच बुडाली आणि हि दुर्घटना घडली.