अमरावती – अमरावती जिल्ह्यात एक दुमजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. ही इमारत अमरावती शहराच्या मुख्य बाजारपेठेत आहे. याठिकाणी सध्या महापालिका अधिकारी, अग्निशमन दलाच्या पथकाकडून मदतकार्य सुरु आहे.
अमरावती शहरातील प्रभात टॉकिज जवळील जीर्ण झालेली दुमजली इमारत रविवारी दुपारी कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून पाच मृतदेह काढण्यात आले आहेत.
महापालिककेने सुमारे चार वर्षांपूर्वी ही इमारत जीर्ण झाल्याने संबंधितांना नोटीस बजावली होती. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून ही इमारत पाडण्याचे काम सुरू होते. रविवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास इमारतीचा पहिला माळा अचानक कोसळला.