रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर फुडमॉलजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. टेम्पो, ट्रेलर आणि कार अशा पाच गाड्यांचा अपघात झाला आहे. अपघातात पाचही गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दरम्यान, या अपघातात नवी मुंबई महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी वैभव झुंजारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये नवी मुंबईतील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. मृतामध्ये पाच वर्षाच्या एका लहान मुलीचाही समावेश आहे. जखमींपैकी दोघांना पनवेल, दोघांना वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास घडला.
क्रेटा, इनोव्हा, ट्रेलर, ट्रक अशा पाच वाहनांचा हा अपघात झाला आहे. चार मृतदेह खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तर एका जखमीचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात नवी मुंबई महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी वैभव झुंजारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे. वैभव झुंजारे हे त्यांच्या खासगी कारने ते नवी मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. यात त्यांची आई, पत्नी व मुलीचा मृत्यू झाला आहे.
झुंजारे हे सोलापूर येथील गावी कुटुंबाला घेऊन येण्यासाठी गेले होते. कोरोना काळात त्यांच्यावर कोरोना नियंत्रणाची जबाबदारी असल्याने खबरदारी म्हणून त्यांनी आई, वडील, पत्नी व मुलांना गावी ठेवले होते. आता कोरोना संकटाची तीव्रता कमी झाल्यानं ते कुटुंबाला घेऊन घरी येत होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला.
अपघातातील मृतांची नावे…
१) श्रीमती मंजू प्रकाश नाहर, वय ५८, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम,
२) डॉ. वैभव वसंत झुंझारे, वय ४१, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,
३) सौ. उषा वसंत झुंझारे, वय ६३, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,
४) सौ. वैशाली वैभव झुंझारे, वय ३८, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,
५) कु.श्रिया वैभव झुंझारे, वय-५, रा.ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,
यांचा समावेश आहे.
या अपघातात जखमी झालेल्यांची नावे
१) स्वप्नील सोनाजी कांबळे, ३० वर्षे, रा. फ्लॅट नं. २०१, इंद्रपुरी, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव (पश्चिम) (जखमी)
२) प्रकाश हेमराज नाहर, वय-६५, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम, (जखमी)
३) कु.अर्णव वैभव झुंझारे, वय-११, रा.ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई, (जखमी)
४) किशन चौधरी, (गंभीर जखमी)
५) काळूराम जमनाजी जाट (गंभीर जखमी)