बिडेन यांच्या मुलाला रशिया, चीनने पैसे दिले

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे मतदान जवळ येत असतानाच विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधी उमेदवार डेमोक्रॅटीक पक्षाचे ज्यो बिडेन यांच्यावरचा हल्ला तेज केला आहे. ट्रम्प यांच्या मुलाला रशिया आणि चीनकडून मोठी रक्कम मिळाली असल्याचा व त्यावर माध्यमे गप्प बसल्याचा घणाघाती आरोप आता ट्रम्प यांनी केला आहे.

रविवारी व्हाइट हाउस येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, बिडेन यांच्या मुलाला पैसे मिळाल्याच्या विषयावर प्रमुख प्रसार माध्यमे गप्प बसली आहेत, यावर विश्‍वास ठेवणेच अवघड झाले आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या एका सिनेटरने यासंदर्भात गेल्या आठवड्यात एक अहवाल जारी केला होता. त्यानुसार बिडेन यांचा मुलगा हंटर याला एलेना बेटुरिना यांच्याकडून 3.5 दशलक्ष अमेरिकी डॉलर मिळाले आहेत. चीनी नागरिकांनीही बिडेन यांच्या कुटुंबातील सदस्यांना पैसे दिले असल्याचे याच अहवालात म्हटले आहे. हंटर आणि बिडेन यांचा भाउ जेम्स यांना आंतरराष्ट्रीय खरेदीसाठी एक लाख डॉलर्सचे क्रेडीट कार्ड देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.

ट्रम्प म्हणाले की अशा प्रकारच्या बातम्या येउनही अमेरिकेतील प्रमुख माध्यमे याबाबत प्रश्‍न न विचारता शांत बसले आहेत. आपल्याकडे जर निष्पक्ष आणि विश्‍वासार्ह माध्यमे असतील तर प्रदीर्घ काळ लक्षात राहतील अशा या बातम्या असतील. तरच आपण खऱ्या निवड समितीने दिलेल्या पुरस्काराचे मानकरी ठराल. खोट्य समितीने दिलेल्या खोट्या पुरस्कारांचे नाही, अशा शब्दांत त्यांनी माध्यमांवरही ताशेरे ओढले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.