ट्रम्प यांनी घातलेले सोशल मिडीयावरील निर्बंध बायडेन यांनी उठवले

वॉशिंग्टन – अमेरिकेत सोशल मिडीयावर माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घातलेल्या निर्बंधांबाबतचे आदेश अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी उठवले आहेत. ट्रम्प यांनी 2020 मध्ये अमेरिकेतील सोशल मिडीया नियामकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना उत्तरदायित्वाच्या संरक्षणावर मर्यादा घालण्याचे निर्देश दिले होते.

त्या आदेशांविरोधात “द सेंटर फॉर डेमोक्रॅटिक ऍन्ड टेक्‍नोलॉजी’ने कोर्टात याचिका दाखल केली होती. ट्रम्प यांच्या आदेशाची प्रतिक्रिया म्हणून सोशल मिडीया प्लॅटफॉर्मकडून चुकीची माहिती प्रस्तुत केली जाऊ शकेल. तसेच द्वेषयुक्‍त वक्‍तव्ये बिना तपासताच सोशल मिडीयावर पोस्ट केली जाऊ शकतील, असे सांगून बायडेन यांनी ट्रम्प यांचे आदेश उठवले. बायडेन यांच्या निर्णयाचे “द सेंटर फॉर डेमोक्रॅटिक ऍन्ड टेक्‍नोलॉजी’ने स्वागत केले आहे.

कम्युनिकेशन डिक्री ऍक्‍ट अंतर्गत सोशल मिडीया कंपन्यांच्या संरक्षणाबाबत नव्याने नियम आखण्यासाठी “फेडरल कम्युनिकेशन कमिशन’ नियुक्‍त करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. या कायद्यानुसार सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या माहितीची जबाबदारी सोशल मिडीया कंपनीवर टाकली जाऊ शकत नसते.

गेल्या वर्षीच्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीमध्ये व्यापकपणे मतदारांची फसवणूक झाल्याचा दावा असलेल्या ट्रम्प यांच्या ट्‌विटला ट्‌विटरने टॅग केल्यावर ट्रम्प यांचा कार्यकारी आदेश जारी करण्यात आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.