कुत्र्यासोबत खेळताना बायडेन जखमी

वॉशिंग्टन – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन अध्यक्षपदाची धुरा स्वीकारण्याच्या अगोदरच जखमी झाले आहेत. आपल्या पाळीव कुत्र्यासोबत खेळत असताना ते खाली पडले आणि फ्रॅक्‍चर झाले. बायडेन हे 20 जानेवारीला राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. अपघातानंतर राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बायडेन आपल्या कुत्र्यासोबत खेळत असताना पडले. त्यांच्या डाव्या पायाच्या हाडामध्ये क्रॅक आलाय. त्यामुळे ते पुढचे काही दिवस मदतीशिवाय चालू शकत नाहीत. बायडेन यांचा पाय मुरगळला. त्यामुळे एक्‍सरेत हे दिसलं नसल्याचे त्यांचे पर्सनल चिकित्सक केविन ओ कॉर्नर यांनी सांगितले. पण डाव्या पायाच्या हाडात क्रॅक आल्याचा खुलासा सीटी स्कॅन अहवालातून झाला.

बायडेन हे जर्मन शेफड जातीच्या कुत्र्याचे ‘मेजर’ मालक आहेत. त्यांच्याकडे असे दोन कुत्रे आहेत. दरम्यान राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील विजयानंतर बायडेन आता 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतील. त्यांनी आपल्या मंत्र्यांची निवड सुरु केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.