बिडेन यांनी केला ट्रम्प यांचा मूर्ख म्हणून उल्लेख!

तोंडावर मास्क न घालण्याच्या कृतीचा केला निषेध

वॉशिंग्टन: डमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदवार ज्यो बिडेन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख जाहीरपणे मूर्ख असा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. करोना महामारीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी चेहेऱ्यावर मास्क घालण्यास ट्रम्प यांनी विरोध केला होता. त्यांची ही भूमिका मुर्खपणाची असून त्यातून मृत्यूचे प्रमाण वाढण्याचाच धोका अधिक आहे असे त्यांनी म्हटले आहे.

बिडेन हे गेले दोन महिने घरातच थांबून होते. करोनामुळे त्यांनी जाहींर कार्यक्रमातील सहभाग टाळला होता. त्यानंतर काल प्रथमच त्यांनी चेहेऱ्यावर मास्क घालून जाहीर दर्शन दिले. त्यांच्या या फोटोची ट्रम्प यांनी खिल्ली उडवली होती त्यावर प्रतिक्रीया देताना बिडेन यांनी वरील टिपण्णी केली. एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ट्रम्प हे मूर्ख आहेत अगदी मूर्ख ! करोनाची काळजी घेताना त्यांनी स्वता तसे वागून दाखवून द्यायला हवे होते. पण त्यांच्या दुर्लक्षामुळेच देशात करोनाचे प्रमाण वाढले.

एक लाखावर लोक मृत्युमुखी पडले आहेत. त्यातील किमान 50 टक्के मृत्यू टाळले जाऊ शकले असते. अमेरिकन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीच लोकांना तोंडावर मास्क घालण्याची सूचना केली होती. पण ट्रम्प यांनी कधीच स्वताच्या चेहेऱ्यावर मास्क घातला नाही. उलट त्यांनी असे न करण्यासाठीच लोकांना उद्युक्त केले असा आरोपहीं बिडेन यांनी केला. मास्कवरूनही राजकारण करण्याच्या ट्रम्प यांच्या प्रवृत्तीचा त्यांनी निषेध केला.

Leave A Reply

Your email address will not be published.