बिबट्याने पाडला कालवडीचा फडशा

पिंपरी पेंढार येथील गाजरपट शिवारात हल्ला

आळेफाटा – पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील गाजरपट शिवारात शनिवारी (दि. 7) पहाटे चारच्या सुमारास बिबट्याने कालवडवर हल्ला करून फडशा केले.

पिंपरी पेंढार येथील गाजरपट शिवारात चंद्रकांत बजाबा डेरे यांच्या जनावरांच्या गोठ्यात बिबट्याने हल्लाकरून एक तीन वर्षे वयाची कालवड ठार केली, त्यामुळे त्यांचे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमधील कालवड मोठी असल्याने बिबट्याला घेऊन जाणे शक्‍य नसल्यामुळे या गोठ्याच्या बाजूला नेऊन कालवडीचा त्याने फडशा पाडला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गेल्या अनेक दिवसांपासून दोन बिबटे या परिसरात नागरिकांच्या निदर्शनास येत आहे.

बिबट्याच्या दहशतीमुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले असून या बिबट्यांचा माणसांवरही हल्ला होण्याची शक्‍यता आहे. सध्या शेतांमध्ये कांदा लागवड, खुरपणी, पाणी देणे, गहू, हरभरा अशी अनेक कामे शेतकरी करीत आहेत. शेतीच्या कामांना वेग आला आहे; परंतु बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करणे कठीण झाले आहे. बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी तणावाखालीच शेतीची कामे करीत आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.