दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला

संग्रहित छायाचित्र...

निमगाव सावा येथे घडली घटना

अणे – निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे सोमवारी (दि. 11) रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीस्वारांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक जण किरकोळ जखमी, तर एक जण प्रचंड भयभीत झाले आहेत. नामदेव पांडुरंग गाडगे (वय 43) हे किरकोळ तर विजय गंगाराम गाडगे (वय 30) हे भयभीत झाले आहेत.

हे दोघे निमगाव सावामधून पटाडी मळ्यामध्ये दुचाकीवरून जात असताना रात्रीच्या अंधारात उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. घटनेची माहिती कळताच या ठिकाणी वनरक्षक के. जी. भालेराव व संदीप खोत घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, नामदेव घाडगे यांच्या पायाला दुखापत झाली आल्याने त्यांना ताबडतोब निमगाव सावा येथील बोरा हॉस्पिटलमध्ये प्रथम उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्रथम उपचार केल्यानंतर त्यांच्या मंगळवारी (दि. 12) नामदेव गाडगे यांना घोडेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. यावेळी त्यांच्याबरोबर वनरक्षक के. जी. भालेराव, खोडदचे वनपाल संदीप खोत व ग्रामस्थ होते. ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणावरून 300 मीटर अंतरावर वन विभागाने पिंजरा लावला आहे, पण बिबट्याच्या पिंजऱ्याकडे फिरकत नसल्याने या पिंजऱ्याचा काही उपयोग होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here