नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधानांचा भूतानमधील दुसरा आणि दौऱ्यातील शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आज मोदींनी भूतानच्या थिंपूमधील रॉयल युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी दक्षिण आशियातील उपग्रह थिंपू ग्राऊंड स्टेशनचे उद्घघाटन केले. तसेच भूतान याव्दारे लवकरच आपले स्वनिर्मीत उपग्रह अंतराळात सोडेल असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केला. तसेच 2022 पर्यंत भारत अंतराळात एक भारतीय पाठवण्याचा विचार करत असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले.
PM Modi at Royal University of Bhutan: It is a matter of great happiness that young Bhutanese scientists will travel to India to work on designing and launching Bhutan’s own small satellite. I hope that someday soon, many of you will be scientists, engineers and innovators pic.twitter.com/jPoyuOhWbN
— ANI (@ANI) August 18, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच आपलाला आशा आहे की आपल्यामधील काही जण वैज्ञानिक, इंजिनिअर आणि इनोवेटर्स होतील, तसेच उपग्रह स्टेशनव्दारे दोन्ही देशातील आंतराळ मदतीच्या कक्षा रुंदावल्या असल्याचेही यावेळी मोदींनी म्हटले. तसेच या उपग्रहाच्या माध्यमातून दुरध्वनी, दुरस्थ शिक्षण, मॅपिंग, हवामान अंदाज आणि नैसर्गिक आपत्तीचा इशारा आता भूतानसह अन्य देशांनाही होणार असल्याचे मोदींनी म्हटले. तसेच भारत आणि भूतानची संस्कृति एकच आहे त्यामुळे दोन्ही देशांचे नातेही तेवढेच घट्ट आहे. तसेच भारत सध्या विकासाच्या दृष्टीने काम करत असून बेरोजगारांना आता आमच्या देशातच वेगवेगळ्या संधी मिळत असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले. दरम्यान, काल दोन्ही देशांमध्ये आर्थिक आणि सामाजिक संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने काही करार झाले आहेत.