लोणावळा – पर्यटकांचे आकर्षक स्थळ असलेल्या भुशी धरणावर गुरुवारी (दि. 1) दोन तृतीयपंथीयांनी चांगलाच उच्छाद मांडला. विवस्त्र होत अश्लील हावभाव करीत धरणावर वर्षाविहारासाठी आलेल्या अन्य पर्यटकांना त्रास दिला. या तृतीयपंथीयांनी रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तसेच नागरिकांवर हल्ला करीत धरण परिसरात मोठा गोंधळ घातला.
अश्विनी शिरसाट व आम्रपाली शिंदे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भूशी धरणावर गुरुवारी (दि. 1) सायंकाळीच्या सुमारास फिरायला आलेल्या दोन तृतीयपंथीयांनी धरणाच्या पायऱ्यांवर गोंधळ घातला. दारूच्या नशेत स्वतःच्या अंगावरील पूर्ण कपडे काढून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुली, महिला पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. हा सर्व प्रकार सुरू असताना बंदोबस्ताला असलेले पोलीस शिपाई प्रकाश झेंडे, मुंडे, होमगार्ड अक्षय कोकाटे यांनी तृतीयपंथीयांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी अश्लिल वर्तन करीत त्यांनाच मारहाण केली.