भुसार बाजार भरणार; भाजीपाला विभाग मात्र बंदच

पुणे – मार्केट यार्डातील भुसार विभाग सुरूच राहणार आहे. बाजार समिती, पोलीस प्रशासन, कामगार संघटना आणि दी पूना मर्चंट्‌स चेंबरच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. मर्यादित मालाची आवक, गर्दी होणार नाही, याची दक्षता आणि सॅनिटायझर, मास्क आणि फिजिकल डिस्टंन्सिग उपाययोजना करून सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत हा बाजार सुरू राहणार असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी सांगितले. मुख्य आवारातील फळ, भाजीपाला विभाग मात्र बंदच राहणार आहे.

मार्केट यार्ड लगतच्या रहिवासी भागात करोना रुग्ण आढळले. या पार्श्‍वभूमीवर भीती पसरल्याने कामावर न येण्याचा निर्णय कामगारांनी घेतला होता. त्यावर प्रशासनाने ही बैठक आयोजित केली होती. बाधित क्षेत्रातील लोक बाजार आवारात येणार नाहीत, याची उपाययोजना बाजार समिती आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.

उपचारांसाठी सांघिक जबाबदारी घेणार…
विमा उतरवण्याची कामगारांची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव बाजार समिती प्रशासनाने पणन संचालकांकडे पाठवला आहे. सरकार त्यावर सकारात्मक आहे. तो निर्णय येईपर्यंत बाजार आवारातील एखादा व्यापारी अथवा कामगाराला करोनाचा प्रादुर्भाव झाला, तो बाजारातील म्हणजे कुटुंबातील घटक आहे, म्हणून त्याच्याकडे पाहिले जाईल. त्याच्या वैद्यकीय उपचार आणि तंदुरूस्तीसाठी सांघिकपणे जबाबदारी घेतली जाईल, असे बाजार समिती प्रशासनाचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.