आळंदी – वारकरी शिक्षण संस्थेस राज्य शासनाने वसतिगृह इमारत बांधकाम व विविध सुविधा निर्माण करण्यासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या निधीतून विकसित होत असलेल्या वसतिगृह इमारत बांधकामाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे, सचिव नाना महाराज चंदिले, विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, व्यवस्थापक तुकाराम महाराज मुळीक, नरहरी महाराज चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घुंडरे पाटील, सामाजिक कार्यकर्ते नितिन घुंडरे यांचेसह वारकरी विद्यार्थी उपस्थित होते.
सचिव नाना महाराज चंदिले यांचे हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन खजिनदार भालचंद्र नलावडे यांनी केले. विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड यांनी आभार मानले.