पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या भूमिपूजनाचा समारंभ आज (15 जून) आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उपकेंद्राच्या उभारणीला अखेर सुरुवात होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षकांसह विद्यापीठ अधिकार मंडळातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नाशिक जिल्ह्यात सुमारे 63 एकर परिसरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू केले जाणार आहे. त्यासाठी सर्व शासकीय मान्यता मिळालेले आहेत. तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमास ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे आणि कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवारसह आदी यावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.