बॉलीवूड अभिनेत्री भूमि पेडणेकरने आपल्या दमदार अभिनयाच्या मदतीने प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. “दम लगाके हैशा हो’, “टॉयलेट एक प्रेमकथा’ आणि “पति, पत्नी और वो’
या चित्रपटातून भूमि पेडणेकरने देसी गर्लची भूमिका साकारत स्वतःची एक स्वतंत्र ओळख तयार केली आहे.
या चित्रपटातून तिचा ग्लॅमरस लूक प्रेक्षकांना जास्त दिसून आला नाही. यातील भूमिची पारंपरिक वेशभूषा चाहत्यांना खूपच भावली आहे. त्यातच भूमिने सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस लुकची झळक
तिच्या चाहत्यांना दिली आहे.
भूमि पेडणेकरनेही तिचे हॉट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करायला सुरुवात केली आहे. अलीकडेच तिचा ग्लॅमरस लूक पाहावयास मिळाला. तथापि, लोकांनी भूमीच्या या लूक आणि ड्रेसची तुलना थेट प्रियांका
चोप्राशी करण्यास सुरुवात केली आहे. प्रियांकाने काही दिवसांपूर्वी असाच ग्लॅमरस अवतार दर्शविला होता.
भूमिच्या या फोटोंना 23 तासांत तब्बल सव्वा तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. बहुतेक कमेंट्समध्ये तिच्या लुकचे कौतुक करण्यात येत आले असून अनेकांनी तिचे फोटो री-पोस्ट केले आहेत.