करोना व्हायरसच्या संसर्गातून अलीकडेच बरी झालेली भूमी पेडणेकर आता इतरांच्या मदतीसाठी कोविड वॉरियर बनली आहे. जर खरोखर कोणी अडचणीत असेल आणि कुणाला तातडीने वैद्यकीय मदत हवी असेल, तर आपल्याशी संपर्क साधू शकता, असे आवाहन करणारी पोस्ट भूमीने इंस्टाग्रामवर केली आहे. आपण सगळेजण कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमध्ये आहोत.
View this post on Instagram
या कठीण परिस्थितीत वैद्यकीय सुविधा, प्लाझ्मा आणि अशा स्वरूपाची मदत लागू शकते. माझ्या ओळखीतून मिळालेली माहिती मी इतरांना देऊ शकेन, असेही भूमीने म्हटले आहे. आपल्याजवळ असलेले नंबर खोटे नाहीत याची खातरजमा आता केली जात असल्याचेही भूमीने म्हटले आहे.
View this post on Instagram
आपल्यासारखा पुढाकार इतरांनीही घ्यावा आणि इतरांना मदत करावी, असे आवाहन तिने सगळ्यांना केले आहे. बॉलीवूडमधील डझनभर कलाकार मध्यंतरी करोना पॉझिटिव्ह ठरले होते.