भूमी पेडणेकर पर्यावरणप्रेमी आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तिने हवामान बदलाविषयी जनजागृती करायला सुरुवात केली होती. याच अभियानामध्ये सक्रिय झाल्यावर तिने आता स्वतःच्या आहारामध्येही बदल करण्याचे ठरवले आहे. आता भूमी पेडणेकर पूर्णपणे शाकाहारी बनली आहे. तिला पूर्वीपासूनच शाकाहारी व्हायचे होते.
मात्र अनेक वर्षांच्या सवयी मोडणे अवघड झाले होते. पण हवामान बदलाच्या जनजागृतीमध्ये सक्रिय झाल्यपासून तिने आपला निर्धार अधिक ठाम केला आणि शाकाहाराचा स्वीकार केला. लॉकडाऊन सुरू झाल्यावर तिने आपल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली होती. गेल्या 6 महिन्यात तिने अजिबात मांसाहार केलेला नाही. त्यामुळे अधिक चैतन्यमयी वाटू लागले आहे, असा तिचा अनुभव आहे. मुख्य म्हणजे अजिबात अपराधीपणाची भावनाही जाणवत नाही, म्हणून ती खुशीत आहे.
हवमान बदलाविषयी ऑनलाइन आणि ऑफलाइन जनजागृती करण्यासाठी भूमीने “क्लायमेट वॉरिअर्स’नावाने एक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ती भारतीयांना पर्यावरण रक्षणाबद्दल आवाहन करत असते. भूमीचा “दुर्गावती’ या वर्षी 11 डिसेंबरला “ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर रिलीज होतो आहे. याचे डबिंग नुकतेच तिने संपवले आहे. तिने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.