पौड – चाले (ता. मुळशी) येथील स्वस्त धान्य दुकानाला अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भेट दिली. या दरम्यान त्यांनी आयएससो नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची पाहणी केली.
भुजबळ हे चाले येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी गावातील परवानाधारक धनंजय दाभाडे यांच्या स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली.यामुळे प्रशासनाची दमछाक झाली. यावेळी शासनाने आयएससो नामांकन प्राप्त करण्यासाठी ठरवून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन केले जाते, की नाही याची पाहणी केली.
भुजबळ यांनी आयएसओ नामांकन आवश्यक असलेल्या अटी व नियमांनुसार वजनमापे काटा, धान्यवाटप प्रमाणपत्र फलक, दरपत्रक, दक्षता कमिटी बोर्ड, परवाना फलक, अग्निशमन यंत्र, प्रथमोपचार कीट, तक्रार पुस्तिका, ऑनलाइन विक्री रजिस्टर या बाबींची पूर्तता केल्याची पाहणी केली. दुकानदाराकडून आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी आवश्यक अटी व नियमांची पूर्तता केल्याने रेशन दुकानास आयएसओ प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा सूचना दिल्या.