भोसरी आत्महत्या प्रकरणास नवे वळण 

पित्याला कोठडी : पत्नीच्या मदतीने तिन्ही चिमुकल्यांचा गळा आवळला 

पुणे  – भोसरी येथील आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. दोन मुलींवर त्याने अत्याचार केल्यानंतर पत्नीच्या मदतीने दोन मुली, मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पत्नीने पती बाहेर गेल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मूळचे कर्नाटक येथील पाच जणांचे कुटुंब पुण्यात भोसरी परिसरात राहण्यास आले होते. 28 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास 9 आणि 7 वर्षांच्या मुलींवर अत्याचार केला. त्यानंतर पत्नीच्या मदतीने दोन मुलींसह सहा वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिघांचेही मृतदेह छताला अडकविले. तिघांचा खून करून पिता बाहेर पडल्यानंतर पत्नीने दरवाजा लावत आत्महत्या केली.

पित्याला न्यायालयात हजर करण्याता आले असता, “त्याची पोटेन्सी चाचणी करायची आहे, तुलनात्मक परीक्षणासाठी त्याचे रक्‍त तपासणी करायची आहे. गुन्ह्यामागचे कारणही शोधायचे आहे. तो मूळचा कर्नाटक येथील असून त्याचा पूर्व इतिहास समजून घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी,’ अशी मागणी अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी केली. गुन्ह्याचा तपास भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)