विसगाव खोरे (प्रतिनिधी) : भोर तालुक्यातील विसगाव खो-यातील नेरे येथील रामचंद्र श्रीपती उल्हाळकर यांच्या राहत्या घराला मंगळवार ( दि.२२)पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य, धान्य जळून खाक झाले आहे.
रामचंद्र उल्हाळकर यांच्या घरी कोणी नसल्याने जिवीत हानी टळली आहे. घरातील मिरची कांडप मशीन, शेवाया यंत्र, नुकतेच शेतातून काढून आणलेले भात, ज्वारी, तांदूळ, गहू, कडधान्ये, कपडे संसार उपयोगी वस्तू असे लाखो रुपयांचे आगीने नुकसान झाले आहे.
पहाटे घराला आग लागल्याचे दिसून येताच स्थानिकांनी भोर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलास बोलावून घेण्यात आले. अग्नीशामन दल घटना स्थळी पोहचून आग विझवली.
दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जा देण्याच्या कामाला गती द्यावी – उपमुख्यमंत्री फडणवीस
भोर तालुक्याचे तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. युवा नेते अनिल सावले, ग्रामसेवक जे डी तळेकर,तलाठी साळुंके, उपसरपंच राजेंद्र चिकणे, कोतवाल तानाजी मैंद, ग्रामस्थ उपस्थित होते.