कापूरहोळ – आपण कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेली विकासकामे भोर, वेल्हा, मुळशी मतदारसंघात सर्वात जास्त आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी आणून भोर विधानसभा मतदारसंघ विकासाभिमुख बनवला आहे. केलेली विकासकामे व कॉंग्रेस पक्षाचे विचार व ध्येय धोरणे बुथ कमिटीच्या कार्यकर्त्यांनी गावांगावात, घराघरांत, जनमाणसांपर्यंत पोहचवावीत. भोर मतदार संघातील कॉंग्रेसचा बुथ पॅटर्न सर्वात मजबूत आहे, असा पुनरुच्चार करीत कार्यकर्त्यांनो जय्यत तयारीला लागावे. सोशल मिडीयाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
नसरापूर (ता. भोर) येथे कुंभारकर मंगल कार्यालयात कॉंग्रेस पक्षाच्यावतीने वेळू-भोंगवली जिल्हा परिषद गटातील बूथ कमिटी कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर झाले. शिबिरात कार्यकर्त्यांना विजय बनकर यांनी मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांमध्ये जोश व उत्साह निर्माण करीत बुथ कमिटीचे सुयोग्य काम म्हणजे यश आहे, असे सांगितले.
वेळू-भोंगवली जिल्हा परिषद गटातील कॉंग्रेस पक्षाचे 800 कार्यकर्ते व आजी माजी पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वरूप दिलीप बाठे यांनी व्यक्त विषद केले तर प्रास्तविक शैलेश दादा सोनवणे यांनी केले. यावेळी पोपटराव सुके, विकास कोंडे, अण्णा भिकुले, शंकर धाडवे, रोहन बाठे, मदन खुटवड, दादा आंबवले, उत्तम थोपटे, नितीन दामगुडे, महेश टापरे, अभिमन्यू कोंढाळकर, धनंजय वाडकर, राहुल बोरगे, माऊली पांगारे, हिरामण पांगारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.