मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या अडचणीत वाढ होत आहे. अभिनेत्री विरुद्ध शामला हिल्स पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्रीवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलम 95A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘देव माझ्या ब्राचा आकार घेत आहे’ असे वादग्रस्त विधान अभिनेत्रीने काल केले होते.
श्वेता तिच्या आगामी वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान भोपाळमध्ये दाखल झाली होती. त्यादरम्यान तिने देवाबद्दल विधान केले. ज्यावरून वाद सुरू झाला. या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर गृहमंत्री डॉ.नरोत्तम मिश्रा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरणं ?
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे चर्चेत असली तरी यावेळी तिने दिलेल्या एका वक्तव्यामुळे ती वादात सापडली आहे. श्वेताने पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी अभिनेत्रीच्या वादग्रस्त वक्तव्यावर कठोर भूमिका घेत हे खपवून घेतले जाणार नाही, असे सांगितले.
Actress Shweta Tiwari made a controversial statement on God.. It happens in the press conference of #ShowStopper Webseries..#ShwetaTiwari @rohitroy500@DiganganaS #ControversialStatement #Trending #TrendingNow #ottplatform pic.twitter.com/EqmsibDoy4
— Deep Singh (@Deepsingh_page3) January 26, 2022
श्वेता तिच्या आगामी वेब सीरिजच्या घोषणेसाठी आदल्या दिवशी भोपाळला पोहोचली होती. श्वेता तिच्या टीमसोबत पत्रकार परिषदेत आली होती. यावेळी अभिनेत्रीने माध्यमांशी बोलताना आक्षेपार्ह विधान केले. श्वेता तिवारी म्हणाली, ‘देव माझ्या ब्राचा आकार घेत आहे.’ त्याचवेळी तिच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
एका वेब सीरिजच्या प्रमोशनशी संबंधित एका कार्यक्रमात श्वेताने सांगितले की, देव ब्राचा आकार घेत आहे. अभिनेत्रीने हे मजेशीरपणे सांगितले, मात्र त्यावरून गदारोळ झाला आहे. गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी भोपाळचे आयुक्त मकरंद देउस्कर यांना 24 तासांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.