भोपाळमध्ये बोट उलटून 11 जणांचा मृत्यू

भोपाळ – मध्य प्रदेशात गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली. राजधानी भोपाळमध्ये विसर्जनासाठी गेलेली बोट उलटल्याने 11 जणांचा मृत्यू झाला असून पाच जणांना वाचवण्यात आले आहे.

ही बोट खटलापुरा घाटावर आज पहाटे साडेचारच्या सुमारास उलटली. गणपती विसर्जनासाठी वापरलेली बोट अतिशय लहान होती. मूर्ती विसर्जनासाठी पाण्यात उतरताच बोट एकीकडी झुकली आणि उलटली. यावेळी बोटीतील भाविक मूर्तीच्या खाली अडकले. आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

अपघातातील बेपत्ता लोकांना वाचवण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाची मदत घेण्यात येत आहे. एसडीआरएफच्या पथकाने पाच जणांना वाचवले आहे. दुर्घटनेतील मृत भाविक हे पिपलानीच्या 1100 क्वॉर्टरचे रहिवासी होते.

दरम्यान, अपघाताची चौकशी करणार असल्याची माहिती मध्य प्रदेशचे जनसंपर्क मंत्री पीसी शर्मा यांनी दिली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)