रोजगारासाठी भूमिपुत्रांचा मोर्चा

कृती समितीकडून आयोजन : स्थानिकांना नोकरी मिळावी

वडगाव मावळ – मावळ तालुक्‍यातील कान्हे-नायगाव परिसरातील कंपन्यांमध्ये भूमिपुत्र तरुणांना रोजगार व व्यवसाय संधी मिळण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.7) सकाळी 10:30 वा. रोजगार व व्यवसाय कृती समितीच्या वतीने मावळ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. रोजगार व व्यवसाय कृती समिती कान्हे-नायगाव यांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

श्री पोटोबा महाराज मंदिर ते मावळ तहसील कार्यालयवर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, माजी सभापती विठ्ठल शिंदे, गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, अलका धानिवले, तालुका शिवसेना प्रमुख राजू खांडभोर व कृती समितीचे अध्यक्ष बंडोबा सातकर व सचिव ऍड. केतन सातकर, तसेच कार्यकारिणी सदस्य मदन शेडगे, विजय सातकर, प्रदीप ओव्हाळ, गौरव सातकर, संदीप सातकर, शशिकला सातकर कान्हे, नायगाव व जांभूळ परिसरातील असंख्य नागरिक व महिला भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले की कंपनीच्या माध्यमातून मिळणारा व्यवसाय व नोकरी ही स्थानिकांनाच मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील. स्थानिकांना न्याय द्यायचं काम करणार.

मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले, तालुक्‍यात काम करत असताना राजकीय जोडे बाजूला ठेवून स्थानिकांना न्याय देण्याचे काम करणार असून मावळ तालुक्‍यातील औद्योगिक क्षेत्रात स्थानिक भूमिपुत्रांना जास्तीतजास्त व्यवसाय व नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी अग्रेसर राहणार.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)