खालापूर, (वार्ताहर) – महड गावात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून उपलब्ध निधीतून रस्ते काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या विकासकामाचे रविवारी भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
महड गावात अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या श्री वरदविनायक गणपतीचे मंदिर आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे.
भाजपा युवा मोर्चाचे प्रसाद पाटील यांनी मंत्री चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर गावातील दोन रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
याप्रसंगी पक्षाचे सरचिटणीस दीपक बेहेरे, उपजिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे, उपजिल्हाध्यक्ष सनी यादव, संयोजक प्रसाद पाटील, अतुल बडगुजर आदी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.