हडपसर – संविधान चौक येथे १५० फुटी तिरंगा बसविण्याच्या कामाचे भूमिपुजन संपन्न झाले आहे. वानवडी प्रभागाच्या एका बाजूला लष्कर छावणी तर दुसऱ्या बाजूला एस.आर.पी. एफ. चे गट क्रमांक १ व २ या परिसरातील रहिवासी परिसर आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या सुखाचा त्याग करत कायमच सेवा देणारे जवान व राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमी सज्ज असणारे पोलीस बांधव यांच्याशी संलग्न असणाऱ्या वानवडीमध्ये पोलीस बांधव व लष्करातील जवान यांना वानवडीच्या कुठल्याही भागातून दिसणारा उंच तिरंगा वानवडी प्रभागात बसविण्याचा माजी नगरसेवक प्रशांत जगताप व माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप यांचा गेल्या अनेक दिवसांपासूनचा मानस होता.
आज संविधान चौक येथे तब्बल १५० फूट उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज बसविण्याचा कामाला सुरुवात झाली. प्रभागातील नागरिकांच्या साक्षीने या कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. ‘तिरंगा’ आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे. आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतीक आहे. तिरंगा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. निश्चितच येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होऊन दिमाखदारपणे फडकणारा आपला भारतीय राष्ट्रध्वज संविधान चौक येथे बसविण्यात येणार आहे.
या कार्यक्रम प्रसंगी मोहन आबनावे, डाँ.किशोर शहाणे, रियाझ पटेल, बाबा इनामदार,अनिल जगताप, संजय भोसले, अमोल बाचल, केविन मँन्युअल, सचिन शिंदे, प्रिती चड्डा, प्रफुल्ल जांभूळकर, सुरेश गव्हाणे, आरीफ मोमीन, सचिन टाळके, शाहरुख इनामदार, प्रमोद कांबळे, निखिल कांबळे, शहानवाज शेख व आदी मान्यवर उपस्थित होते.