अर्जुन कपूरने अलीकडेच आपल्या आगामी “द लेडी किलर’मधील हिरोईनची घोषणा केली आहे. “द लेडी किलर’ या नावातूनच या सिनेमात ऍक्शन, थ्रिर असणार आहे, याची कल्पना येते.
एवढेच नव्हे तर या सिनेमात रोमान्स आणि सस्पेन्सही असणार आहे, असे अर्जुन कपूरने म्हटले आहे. यात अर्जुन बरोबर लीड रेल साकारण्यासाठी भूमी पेडणेकर असणार आहे, असे अर्जुनने जाहीर केले आहे.
अर्जुन आणि भूमी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिनवर दिसणार आहेत. भूमीची निवड जरी निश्चित झाली असली तरी अजून निर्मात्यांकडून त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भूमी आणि अर्जुन दोघांकडे सध्ये अनेक प्रोजेक्ट आहेत.
अर्जुन लवकरच मोहित सूरीच्या “एक व्हिलन रिटर्न्स’चे शुटिंग सुरू करणार आहे. त्याशिवाय आसमान भारद्वाजच्या “कुत्ते’मध्येही तो दिसणार आहे. तर दुसरीकडे भूमी राजकुमार रावबरोबर “बधाई दो’मध्ये असणार आहे.
याशिवाय ती “रक्षाबंधन’मध्येही ती असणार आहे. यामध्ये ती पुन्हा एकदा अक्षय कुमारबरोबर दिसणार आहे. यापूर्वी दोघेही “टॉयलेट- एक प्रेमकथा’मध्ये एकत्र होते.