मुंबई : कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भुमिका असलेला भुल भुलैया 3 या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा OTT वर रिलीज करण्यात येणार आहे. हा सिनेमा सिनेमा लवकरच Netflix वर स्ट्रिम होणार आहे. बुधवारी, नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट करून याची माहिती दिली आहे.
नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन कॅमेऱ्याकडे धावताना दिसत आहे. नेटफ्लिक्सने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “तुडुम: कार्तिक आर्यन तुमच्यासाठी ख्रिसमस सरप्राईज आहे! लवकरच येत आहे.” हा चित्रपट 27 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.
या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास भूल भुलैया 3 हा हॉरर-कॉमेडी सिनेमा भूल भुलैयाचा तिसरा भाग आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा खूप आवडला. या चित्रपटात कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरा, विद्या बालन, माधुरी दीक्षित, राजपाल यादव, विजय राज यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा चित्रपटगृहांनंतर ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.