‘गंगेत वाहणारे मृतदेह भारताचे नाहीच ते तर नायजेरियाचे’

गंगेत वाहत असलेल्या मृतदेहांविषयी अभिनेत्री कंगणा राणावतने केले भाष्य

मुंबई  : कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  दिवसांपूर्वी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये नद्यांमध्ये नागरिकांचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. याच मुद्द्यावरून आता विरोधी पक्षाने  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर  हल्लाबोल केला आहे. यातच गंगेत वाहत असलेल्या मृतदेहांविषयी अभिनेत्री कंगणा राणावतने  भाष्य केलं आहे.

कंगणानं फेसबुक या मुद्यावरून एक व्हिडियो शेअर केला आहे. त्यामध्ये कंगणानं इस्त्राईल, पॅलेस्टाईन आणि गंगेत वाहत असलेल्या मृतदेहांबाबत भाष्य केले आहे. कंगणानं ईदच्या चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. तिनं जो व्हिडिओ शेअर केला आहे त्याविषयी चर्चा सुरु झाली आहे. याचा परिणाम म्हणजे कंगणा मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली आहे.

दरम्यान, बिहारच्या बक्सरमध्ये गंगेच्या बाजूला 110 पेक्षा जास्त मृतदेह सापडल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली होती. याच मुद्दयावरून बिहार आणि उत्तर प्रदेश सरकार एकमेकांच्या समोर उभे टाकले असल्याचे दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.