बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्येही आता करोना महामारीने शिरकाव केला आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार करोना पॉझिटिव्ह आढळून येत असून आता भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबेलाही करोनाने आपल्या कवेत घेतले आहे. याबाबत स्वतः आम्रपाली दुबेने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत माहिती दिली.
सध्या आम्रपाली दुबे आपल्या घरीच होम क्वारंटाइन आहे. तिने इंस्टावरील पोस्टमध्ये लिहिले की, आज सकाळीच माझी कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी आणि माझे कुटुंबिय आता सर्व खबरदारी बाळगत असून योग्य उपचार घेत आहे.
दरम्यान, आम्रपाली आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होती. याप्रसंगी तिला करोना झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही अक्षय कुमारला करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्याच्या टीममधील अनेकांनाही करोना झाला होता.