भिवंडी – गेल्या काही दिवसांत राज्यातील करोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात करोना लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. त्यातच लसीचा दुसरा डोस घेतल्याने एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालीय. सुखदेव महापती किर्दत (वय-41) यांचा दुसरा डोस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रातच मृत्यू झाला आहे.
सुखदेव किर्दत हे चालक म्हणून कार्यरत होते. भिवंडी येथील भाग्यनगर लसीकरण केंद्रावर करोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गेले असता त्यांच्यासोबत हा प्रसंग घडला. लस घेतल्यानंतर ताप येणे, अंग दुखणे असा त्रास होत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, किर्दत यांच्या मृत्यूमुळे आजूबाजूच्या परिसरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.