खंडणी प्रकरणात भिवंडीच्या एमआयएम शाखा अध्यक्षास अटक

ठाणे – बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एमआयएम पक्षाचा भिवंडी शाखेचा अध्यक्ष मोहंमद खलिद शेख आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.

खंडणीसाठी या टोळीने बांधकाम व्यावसायिकाला एकेठिकाणी कोंडून ठेवले होते. त्या घरावर पोलिसांनी छापा टाकून या बिल्डरची सुटका केली आणि संबंधितांना त्वरित अटक केली. मोहंमद शेख आणि त्याचे तीन साथीदार या बांधकाम व्यावसायिकाडून सव्वा लाख रुपयांची खंडणीची मागणी करीत होते.

शेखवर या आधीही खंडणी, अपहरण आणि खुनाचे प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत. पुणे, मुंबई, रायगड आणि गुजरातमध्येही त्याच्यावर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

माजी नगरसेवक असलेला शेख हा गेल्या विधानसभा निवडणुकीत भिवंडी पश्‍चिम मतदारसंघातून एमआयएमच्या तिकीटावर निवडणुकीला उभा होता. पण त्याचा अर्ज छाननीतच बाद झाल्याने त्याला ही निवडणुक लढवता आली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.